अकलूज : अकलूजमधील गुपचूप हॉटेलमध्ये जेवण देण्यास उशीर केला म्हणून गावठी पिस्तूल रोखले. याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला माळशिरस न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज येथील गुपचूप हॉटेलात शंकर खंदारे हा
त्याचा मित्र करण भोसले असे दोघेजण सोबत आले होते. ते एका टेबलला बसून दोन चिकन थाळीची ऑर्डर दिली होती, त्यावेळी हॉटेलमध्ये गर्दी असल्याने त्यांची थाळी येण्यासाठी वेळ लागल्याने त्यांनी तुम्ही हॉटेल चालवता का काय करता, असे म्हणत शिवीगाळ करून पिस्तूल काढले. याबाबत हॉटेलचालक काकासाहेब जगदाळे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी शंकर खंदारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बबनराव साळुंखे करीत आहेत.
परत हॉटेलमालक व वेटर लोकांना तुमच्याकडे बघतो म्हणून दमदाटी करू लागले, पुन्हा त्यांना समजावून सांगून परत पाठवून दिले. त्यानंतर पुन्हा १० मिनिटाने तिसऱ्या वेळी शंकर खंदारे हा किचनकडे जाऊन शिव्या देऊ लागल्याने मॅनेजर मनोज घाडगे हा तेथे आला. शंकर खंदारेने सोबत आणलेले गावठी पिस्टल दाखवले. त्यावेळी मॅनेजर मनोज घाडगे याने त्यास पाठीमागून मिठी मारून त्याला धरले व त्याचे हातात असलेली गावठी पिस्टल काढून घेऊन कामगार विनोद काटेच्या हातात दिली.