22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरबादोल्यातील तरुणाला सव्वा लाखांचा गंडा

बादोल्यातील तरुणाला सव्वा लाखांचा गंडा

अक्कलकोट : मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेली लिंक ओपन करून पाहिली असता, दोन बँकांच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे एक लाख १५ हजार ५३० रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेऊन फसवणूक केली. अज्ञात व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या फसवणुकीची फिर्याद बसवराज सिद्धाराम कत्ते (वय ३१, रा. बादोला बुद्रूक, ता. अवकलकोट) यांनी दिली. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे घडली. फिर्यादी कत्ते यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लिंक आल्यामुळे र ती लिंक ओपन केल्यानंतर फिर्यादीच्या नावावर असलेले ए. यू. स्मॉल फायनान्स बँक व आरबीएल बकँ बजाज फायनान्सरी या दोन्ही बँकांच्या क्रेडिट कार्डमधून एकूण एक लाख १५ हजार ५३० रुपये अज्ञात व्यक्तीने घेऊन फसवणूक केली. पोलिस हवालदार खापरे तपास करीत आहेत.

शासनाने अनेकवेळा अनोळखी लिंक ओपन करू नये, अशी वारंवार सूचना व जनजागृती केलेली असताना सुद्धा सुशिक्षित तरुण वर्गाकडून अशा प्रकारच्या चुका नेहमी होत असतात. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात बसत आहे. अशाप्रकारे ऑनलाइन मोबाईलवरून माहिती विचारून अनेकांची फसवणूक झालेली आहे. सायबर क्राइम विभागाने अशा अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक केली पाहिजे. तरुण व सुशिक्षित वर्गाने सुद्धा लोभापायी कोणत्याही लिंक ओपन करू नये.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR