22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरनिकृष्ट रस्त्यामुळे जुळे सोलापूरकर त्रस्त

निकृष्ट रस्त्यामुळे जुळे सोलापूरकर त्रस्त

सोलापूर : जुळे सोलापूर येथे सैफुल परिसरातील विजापूर रस्त्याला जोडणारा अवघा पाचशे मीटर लांबीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून पूर्ण होत नसल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले मात्र, अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू करण्यात आले असून अवघ्या दोनशे मीटर अंतराच्या डांबरीकरणानंतर हे काम थांबविण्यात आले आहे. जे काम झाले आहे. तेदेखील अंत्यत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सैफुल परिसरात विजापूर महामार्गाला जोडणारे मोजकेच रस्ते आहेत. यामुळे या मार्गावर ताण येत आहे. ओमगर्जना चौक व मीरानगर येथे जाण्यासाठी सैफुल बसस्थानकापासून एकच रस्ता आहे. पूर्वी या रस्त्यावरून सात नंबरची कौंतम चौक ते सैफुल ही बस सुरू होती. सध्या या परिसरातील लोकवस्ती वाढल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे.

सैफुल ते आयएमएस शाळा या रस्त्याला जोडणारा आणखी एक चांगला रस्ता असणे आवश्यक आहे. या परिसरात असा रस्ता आहे, मात्र या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने या रस्त्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला जातो. या मार्गाचे डांबरीकरण झाल्यास सोलापूर शहराकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो व सैफुल ते मीरा पिठाची गिरणी या मार्गासाठी एक नवा पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR