22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील ड्रग्ज तस्करीत तरूणीही सामिल

पुण्यातील ड्रग्ज तस्करीत तरूणीही सामिल

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटचा नुकतेच पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक केली. या प्रकरणात पंजाब, दिल्लीपासून इंग्लंडपर्यंत कनेक्शन पोलिसांना मिळाले. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आता या प्रकरणाकडे लक्ष दिले. या ड्रग्ज तस्करीमध्ये तरूणी देखील सामिल असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाचा मास्टरमाईंड संदिप धुने असल्याचे तपासातून पुढे आले. या प्रकरणी संदिप धुने याची प्रेयसी सोनम पंडित आणि संदिप धुने याच्या आणखी एका मैत्रिणीचा सहभाग दिसून आला आहे. या तरुणीच्या मदतीने आर्थिक व्यवहार होत होते. एमडी तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालामार्फत झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. सुमारे ३.५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १८०० किलो एमडी जप्त केले. या प्रकरणात वैभव उर्फ पिंट्या माने, अजय करोसिया, हैदर नूर शेख, भीमाजी परशुराम साबळे, युवराज बब्रुवान भुजबळ, अयुब अकबर शाह मकादर, संदीप राजपाल कुमार, दिवेश चरणजीत भुतानी आणि संदीप हनुमान सिंह यांना अटक केली. मात्र, या कारवाईमागील सूत्रधार संदीप धुनेसह अन्य काही जण फरार आहेत.

आर्थिक व्यवहारासाठी तरुणीचा वापर
आर्थिक व्यवहार व कायदेशीर मदत करण्यासाठी एका तरुणीचा या रॅकेटमध्ये सहभाग आढळला. संदिप धुने याच्या प्रेयसीसह आणखी एक तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. मास्टरमाईंड असलेल्या संदिप धुने याची प्रेयसी सोनम पंडित हिच्यासोबत संदिप धुने याची आणखी एक मैत्रिणी यामध्ये आहे. त्यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार होत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR