24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीकर्मचा-यांना सातबाराला आधार लिंक करण्याचे प्रशिक्षण

कर्मचा-यांना सातबाराला आधार लिंक करण्याचे प्रशिक्षण

पालम : येथील तहसील कार्यालय येथे दि. ३० नोव्हेंबर रोजी रब्बी ई-पिक पाहणी बाबत सहायक यांचे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. तहिसलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार आर.एन. पवळे, मास्टर ट्रेनर भाऊसाहेब चाळक व रमेश बनसोडे यांच्या कडुन उपस्थीत ग्राम महसुल अधिकारी, सहायक यांना ई-पिक पाहणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणास तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, तलाठी संघटना अध्यक्ष कैलास आगळे व महसुल सहायक शेख इस्माईल, महसुल सेवक माधव कांबळे उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणात शेतक-यांनी दि. १ डिसेंबर पासून रब्बी हंगामातील ई-पिक पाहणी मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करावी. १५ डिसेंबर पासुन पालम तालुक्यातील सर्व महसुली सजामध्ये शेतकरी यांच्या ओळखपत्रासह ७/१२ला आधार लिंक करण्यासाठी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) करणार आहेत.

येत्या तिन महीण्यात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. यामुळे आता जमीनी व्यवहार पारदर्शक व शेतक-यांना ओटीपीव्दारे एसएमएस सुचीत करुन त्याची खातरजमा झाल्यावरच व्यवहार पुर्ण होतील. भुमी अभिलेख विभाग, कृषी विभागाच्या मदतिने अ‍ॅग्री स्टॅक योजनेची अमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील तलाठी व कृषी भागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR