21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयपूर्व दिल्लीमध्ये रंगणार आप-भाजपमध्ये सामना

पूर्व दिल्लीमध्ये रंगणार आप-भाजपमध्ये सामना

नवी दिल्ली : पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजप-आप आमने-सामने आले आहेत. २०१९ मध्ये दिल्लीतील सातही जागांवर विजय मिळवणा-या भाजपने यावेळी सहा खासदारांचे तिकिट कापले आहे. या लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपने राष्ट्रवाद, हिंदुत्व हे मुद्दे उपस्थित करून स्थानिक प्रश्न सोडवण्याचा दावाही केला आहे. पक्षाने येथून हर्ष मल्होत्रा यांना उमेदवारी दिली आहे. तर आम आदमी पक्षाचे कोंडलीचे आमदार कुलदीप कुमार यांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीत ‘आप’ने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. यामुळे कुलदीप कुमार यांना या जागेवर विजयाचा विश्वास आहे.

पूर्व दिल्ली मतदारसंघात प्रमुख मुद्दा हा कच-याचा आहे. पूर्व दिल्लीतील गाझीपूरमधील कच-याचा डोंगर आणि स्वच्छता ही सर्वांत मोठी समस्या आहे. यासोबतच वाहनांचे योग्य पार्किंग नसल्याने नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. माजी महापौर आणि भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांनी खासदारपदी निवडून आल्यानंतर हा कच-याचा डोंगर दूर करण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. तर ठिकठिकाणी पार्किंग, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा विकसित करून मतदारसंघाचा विकास करू असे आश्वासन आप-काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी दिले असून, त्याद्वारे ते ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करत आहेत.

पूर्व दिल्ली मतदारसंघातील स्थिती काय आहे?

पूर्व दिल्लीत मतदारसंघात एकूण विधानसभेच्या दहा जागा आहेत. त्यापैकी तीन जागा (लक्ष्मीनगर, विश्वासनगर आणि गांधीनगर) भाजपने जिंकल्या होत्या. या भागात भाजप अजूनही मजबूत आहे. त्या जोरावर भाजपला पुन्हा विजय मिळेल असा दावा करत आहे. तर आम आदमी पक्षाच्या ताब्यात पूर्व दिल्ली मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यामुळे ‘आप’ने या जागेवर विजय मिळणार असा दावा केला असून, काँग्रेसही त्यांच्यासोबत आहे. पूर्व दिल्लीमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपने विजयाचा दावा केला तरी यावेळी पूर्व दिल्लीकर भाजपवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने मतदारसंघात कसलाच विकास केला नसून, केजरीवाल सरकार आपल्या कामाच्या जोरावर ‘आप’च्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहे. यामुळे पूर्व दिल्लीत कोण विजय मिळवेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार
साल – २०१९
उमेदवार -गौतम गंभीर
पक्ष – भाजप
मते – ६.९६ लाख

साल – २०१४
उमेदवार -महेश गिरी
पक्ष – भाजप
मते -५.७२ लाख

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR