24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रउत्तम खंदारे यांची निरपेक्ष समाजसेवा उल्लेखनीय : प्राचार्य डॉ. वाघमारे

उत्तम खंदारे यांची निरपेक्ष समाजसेवा उल्लेखनीय : प्राचार्य डॉ. वाघमारे

पुर्णा : पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष उत्तम खंदारे यांनी राजकारणाला आदर्श धम्मकारणाची जोड देऊन समाज हिताची कामे मोठ्या प्रमाणावर केली. पूर्णा शहरामध्ये सामाजिक सदभाव, एकता व अखंडता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या निरपेक्ष कार्याबद्दल त्यांना सम्यक समाज या संस्थेचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात येत असल्याचे गौरवपूर्ण उदगार सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी काढले.

सम्यक समाज संघ लातूर यांच्यावतीने सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिमत्त्वांचा गौरव संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संविधान गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. लातूर येथे भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये दि.२६ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील अ‍ॅड.मनोहरराव गोमारे, अ‍ॅड. मंचकराव डोणे, सुप्रसिद्ध विचारवंत व महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. वेदप्रकाश मलावडे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्राचार्य डॉ.वाघमारे म्हणाले की, पूर्णा या ठिकाणी गेल्या दोन दशकापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन सोहळा तथागत मित्र मंडळाच्या माध्यमातून अतिशय भव्य प्रमाणात साजरा करण्याचे काम न.प. माजी उपाध्यक्ष उत्तम खंदारे करीत आहेत. त्यांनी सांची स्तूपाची प्रतिकृतीचे अतिशय भव्य व दिव्य प्रवेशद्वार शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता स्वत: निर्माण केले आहे. या सर्व कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आल्या असल्याचे प्राचार्य डॉ.वाघमारे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR