31.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रअबू सालेमच्या प्रेयसीने केला दुस-याशीच निकाह

अबू सालेमच्या प्रेयसीने केला दुस-याशीच निकाह

मुंबई : संपूर्ण गुन्हेगारी विश्वाला हादरवणारा, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या तुरुंगातील कोठडीची हवा चाखतोय. गुन्हेगारी विश्वातील मोठं नाव असणा-या अबू सालेमला वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला आहे. गँगस्टर अबू सालेम याला तिस-यांदा पार्टनरने डावलल्याचे समोर आले आहे. तुरुंगात असलेल्या गँगस्टर अबू सालेमच्या प्रेयसीने त्याची साथ सोडत दुस-याच व्यक्तीशी संसार थाटला आहे. आता त्याची साथ सोडून गेलेली ही प्रेयसी मुंब्रा येथील रहिवासी आहे.

काही वर्षांपूर्वी अबू सालेम हा सुनावणीसाठी ट्रेनद्वारे प्रवास करत असताना ही महिला त्याच्या शेजारी बसलेली असल्याचा फोटो प्रसिद्ध झाल्यावर ती बरीच चर्चेत आली होती. एका वृत्तपत्रात त्या दोघांचा फोटो छापून आला होता. दोन वर्षांनी, २०१८ साली अबू सालेमने त्याच महिलेसोबत लग्न करण्यासाठी पॅरोलही मागितला होता. तेव्हा त्यांच्या नात्याची पुष्टी झाली होती. मात्र सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र आता त्याच्या या प्रेयसीने ५ जानेवारी रोजी दुस-या व्यक्तीसोबत लग्न करत संसार थाटला.

अबू सालेम सध्या पनवेलच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात २५ वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याचे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला सुमैरा जुमानीशी लग्न झाले होते, परंतु तो तुरुंगात असताना तिने त्याला घटस्फोट दिला. नंतर त्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदीशी जोडलं गेलं, दुस-यांदा गाठ बांधल्यावर त्याच्या ज्या काही आशा होत्या त्या धुळीला मिळाल्याचे दिसले.

५ जानेवारीला प्रेयसीने केले दुस-याशी लग्न
तर २०१६ साली अबू सालेम सोबत जिचा फोटो दिसला होता, त्या प्रेयसीने आता त्याची साथ सोडली आहे. ५ जानेवारी रोजी तिने मुंब्रा येथील एका मॅरेज हॉलमध्ये दुस-या व्यक्तीशी लग्न केले. तिच्या लग्नाची बातमी पसरल्यानंतर तिने सालेमला सोडलंय की तिने लग्न करण्यामागे आणखी दुसरं काही कारण आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचा असा दावा आहे की, तिने अधिकृतपणे सालेमशी लग्न केले नव्हते. पण काही वर्षांपूर्वी अशीही बातमी आली होती की २०१४ साली या जोडप्याने चालत्या ट्रेनमध्ये एका काझीच्या मदतीने निकाह केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR