27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; डोके दगडाने ठेचले

१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; डोके दगडाने ठेचले

जळगाव : प्रतिनिधी
बदलापूरच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरलेला असताना राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातही अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. नराधमाने एका १२ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्याने मुलीला दगडाने ठेचून तिची हत्या केली.

दरम्यान, ७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून पीडिता आपल्या लहान बहिणीसह रस्त्याने आपल्या गावाकडे निघाली होती. या दरम्यान आरोपीने तिला एका शेतात ओढूत नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. पीडितेच्या बहिणीने गावक-यांना घटनेसंदर्भात माहिती दिली. गावक-यांनी मुलीचा शोध घेतला असता, एका शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावक-यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथकं तयार केली. त्यानंतर चोपडा-आडगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR