28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरसावत्र बापाकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

सावत्र बापाकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या महिलेच्या प्रियकराने तिच्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संतापजनक म्हणजे, या नराधमाने मुलीला विवस्त्र करत मोबाईलमध्ये व्हीडीओ चित्रीकरणही केले होते. दरम्यान, सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील पुंडलिकनगर परिसरात ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली.

अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी दोन वर्षांची असताना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यांनतर ती अशपाक गफ्फार शेखसोबत राहू लागली. मात्र, अशपाकची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू केले.

तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसेच, तीला विवस्त्र करत तिचे मोबाईलमध्ये व्हीडीओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे, अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR