25.2 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघाती मृत्यू

माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघाती मृत्यू

अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर शिवरजवळ झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले बाळापूर तालुका मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष राजदत्त मानकर हेसुद्धा अपघातात ठार झाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिडकर हे मानकर यांच्यासोबत दुचाकीने शिवणी विमानतळावर गेले होते. भेट झाल्यानंतर परत येताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिवर येथील पेट्रोल पंपाजवळ जनावरांची वाहतूक करणा-या टेम्पोने (क्र. एमएच १२ पीक्यू २५१२) बिडकर यांच्या दुचाकीला (क्र. एमएच ३० बीआर ९११०) जोरदार धडक दिली.

यात दुचाकीवर असलेले बिडकर व मानकर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद सदस्य ते आमदार
प्रा. तुकाराम बिडकर हे उत्कृष्ट खेळाडू होते. कबड्डी या खेळात त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. जय बजरंग व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कुंभारीसह जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR