27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeधाराशिवमंगरूळ येथील एकाचा काक्रंबा येथे अपघाती मृत्यू

मंगरूळ येथील एकाचा काक्रंबा येथे अपघाती मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
मंगरूळ ता. तुळजापूर येथील यासिन मुलानी यांचा काक्रंबा येथे अपघाती मृत्यू झाला. हा अपघात दि. १० मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाणे येथे दि. १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मयत यासिन महेबुब मुलानी हे दि.१० मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काक्रंबा गावातील जयभवानी धाब्यासमोर रोडवरुन पायी जात होते. दरम्यान टाटा कंपनीच्या ट्रेलरचा चालक आरोपी फैजान इकरान खान रा. रहिमाकुली जि. प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश यांनी धडक दिली.

त्याच्या ताब्यातील टाटा ट्रेलर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून यासिन मुलानी यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात यासिन मुलानी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. वाहन चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता व अपघाताची माहिती न देता पसार झाला. या प्रकरणी आसमा सादिक वाडकर रा. ताकविकी ता. धाराशिव यांनी दि.१३ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR