30 C
Latur
Saturday, June 21, 2025
Homeधाराशिवजागजी येथील महिलेचा दुचाकीवरून पडून मृत्यू

जागजी येथील महिलेचा दुचाकीवरून पडून मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
तालुक्यातील जागजी येथील एका ३४ वर्षीय महिलेचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला. हा अपघात दि. ११ मे रोजी मेंढा ता. धाराशिव येथील तांड्याजवळ झाला. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाणे येथे दि. १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, जागजी ता. धाराशिव येथील चांगदेव राजेंद्र हाटकर व त्यांच्या सोबत मयत सुवर्णा सुनिल हाटकर (वय ३४ वर्षे) हे दोघे दि. ११ मे रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. पाडोळी आ. येथून ट्रॅव्हल्सने पुणे येथे जाण्यासाठी जाताना मेंढा येथील तांड्याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

औसा ते धाराशिव रोडवर आरोपी चांगदेव हाटकर यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी ही हायगई व निष्काळजीपणे चालविल्याने दुचाकी खड्ड्यात आदळली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुवर्णा हाटकर या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुनिल बाबासाहेब हाटकर यांनी दि.१३ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR