22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रनगर जिल्ह्यात अपघात; मृतांची संख्या ८ वर

नगर जिल्ह्यात अपघात; मृतांची संख्या ८ वर

मुंबई : अहमदनगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ काल रात्री झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ८ झाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे. ओतूरवरून कल्याणच्या दिशेने जाणा-या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली होती. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत.

भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पिकअप आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर-कल्याण हायवे रोडजवळ असणा-या पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरून येणा-या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पिकअप चालक स्वत: आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला.

बळिराजाच्या कुटुंबावर काळाचा घाला
भाजीचा पिकअप हा भरधाव वेगात होता. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात भाजीच्या पिकअपमधील पाच आणि रिक्षातील तीन असा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR