25.6 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रआरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

शिंदे बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्हे

ठाणे : बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला आहे. पोलिस आणि अक्षय यांच्यात झटापट झाल्यानंतर अक्षयवर पोलिसांकडून गोळी झाडण्यात आली. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करताना पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे. बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणे योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, माझे कुठल्याही अधिका-यासोबत बोलणे झाले नाही, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. तसेच, आतापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणाची न्यायालयाीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही समोर येईल असेही निकम यांनी सांगितले.

आरोपीनं दिली होती गुन्ह्याची कबुली
विशेष तपास पथकाने (एसआयटी) बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह २० पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा सहभाग असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते. प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आरोपीने या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलिस चौकशीत, तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते. डॉक्टरांसमोर आरोपीने दिलेली माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो असे अधिकान्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील १८३ तरतुदीनुसार दोन्ही यालिकांचा जयाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR