नवी दिल्ली : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) शुक्रवारी मोठे यश मिळाले आहे. एनआयएने या कटाच्या सूत्रधारासह दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसैन शाजिब आणि अदबुल मतीन अहमद ताहा यांना कोलकाताजवळ अटक करण्यात आली आहे. एनआयएला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे याा प्रकरणाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले की, शाजिब हाच व्यक्ती होता ज्याने कॅफेमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवले होते.
१२ एप्रिल रोजी सकाळी फरार आरोपी अब्दुल माथिन ताहा आणि मुसाविर हुसेन शाजेब हे कोलकाताजवळ दिसले होते. दोन्ही आरोपी आपली ओळख लपवून कोलकात्यात राहत होते.गेल्या महिन्यात एनआयएने या दोन आरोपींची माहिती देणा-यास प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.