27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरबनावट नोटा बाळगल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

सोलापूर : बनावट नोटा चलनात आणण्याच्या स्थितीत बाळगल्या प्रकरणी महिबुब उर्फ अब्दुल रशीद बागवान,वय 35 शहानवाझ अ.वाहब शेख, वय 31 साहीर अ.अजीज सालार,वय 33 सर्व रा:- सोलापूर या सर्व आरोपींची गुन्हा शाबित न झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, दि:-5/10/2015 रोजी पोलिसांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एक इसम बनावट नोटा घेऊन मुळेगाव येथून मोटरसायकल वरून सोलापूर कडे जात आहे त्यावरून पोलिसांनी हॉटेल रसिक येथे सापळा लावला होता.साधारण रात्री 11:45 च्या सुमारास पोलिसांना मुळेगाव वरून एक मोटरसायकल येताना दिसली ती त्यांनी थांबवली त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महिबूब बागवान असे सांगितले, त्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून 1000 रुपयाच्या 40 नोटा मिळून आल्या त्या नोटा या शहानवाझ शेख याने त्यास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले, पोलीस तपासादरम्यान त्या नोटा तपासणीसाठी नाशिकला पाठविले असता नोटा बनावट असल्याचा अहवाल आला. वरील आरोपींनी संगणमत करून बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्या प्रकरणी पो.हे.कॉ.सैफन चांदसाब जमादार यांनी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

यात पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर 11 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, बनावट नोटा या आरोपीच्या ताब्यातून जप्त झाल्या असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाकडून शाबीत झाला नाही, त्यामुळे आरोपींनी बनावट नोटा या चलनात आणण्यासाठी बाळगल्या असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे ऍड विनोद सूर्यवंशी ऍड दत्ता गुंड ऍड निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ऍड एस एस क्यातम यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR