30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeधाराशिवउमरगा येथे देहव्यापार करणा-या लॉजवर कारवाई

उमरगा येथे देहव्यापार करणा-या लॉजवर कारवाई

धाराशिव : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने उमरगा येथील आरोग्यनगरी येथील शांतादुर्गा लॉजवर दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलीसांनी देह व्यापार करणा-या व करवून घेणा-या तीघांना अटक केली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथील शांतादुर्गा लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दि. ३० डिसेंबर रोजी छापा टाकल्यानंतर पोलीसांनी आरोपी धनराज हरिश्चंद्र तेलंग (लॉज मॅनेजर), रा. न्यु बालाजी नगर उमरगा, रविंद्र महादेव महतो (वेटर), आशा रामचंद्र तेलंग (लॉज मालक) रा. उमरगा यांना ताब्यात घेतले. या तीघांनी संगणमत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लॉजवर वेश्या व्यवसाय करून घेत होते. महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास परावृत्त करुन तिच्यावरती उपजिवीका करीत असताना पोलीसांना आढळून आले.

पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका केली. पोलीसांनी घटनास्थावरून दोन मोबाईल, नोंदीचे रजिष्टर, रोख रक्कम, निरोधाची पाकिटे असा २८ हजार ३०० रूपये जप्त केले. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन तीघांच्या विरोधात भा.दं.स. कलम ३७०, ३७० (अ) (२), सह अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५ अंतर्गत उमरगा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या आठ दिवसापुर्वी तुळजापूर ते धाराशिव रस्त्यावर बावीपाटी नजिक निसर्ग गारवा लॉजवर कारवाई करून वेश्या व्यवसाय उघडकीस आणला होता. यातील लॉज चालक, मॅनेजर, दलाल न्यायालयीन कोठडीत आहेत. आता उमरगा येथे कारवाई केल्याने पोलीसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR