21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयक्रॉस वोटिंग करणा-या ५ आमदारांवर कारवाईचे आदेश

क्रॉस वोटिंग करणा-या ५ आमदारांवर कारवाईचे आदेश

नवी दिल्ली : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणा-या काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई करण्याचा निर्देश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाविरोधात काम करणा-या आमदारांना कडक इशारा दिला आहे. कोणत्या आमदारांवर कारवाई होणार त्यांची नावंही समोर आली आहेत.

काँग्रेसकडून पाच आमदारांवर कारवाई होणार असली तरी इतर दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देशही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. दरम्यान कारवाई होणा-या आमदारमध्ये झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांचे नाव असल्याची माहिती मिळते आहे. नुकत्याच पार पडलेल्या १३ जागांसाठीच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना मते दिली नसल्याने त्यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची ही मते महायुतीच्या उमेदवारांना गेल्याचा दावा केला जात होता.

दरम्यान, या निवडणुकीनंतर लगेचच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा सर्व प्रकार घातला आणि आमदरांवर कडक कारवाईची शिफारस केली होती. कारण यापूर्वी देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR