पुणे : पुण्यात सध्या अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंगविरोधात कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल पुणे महापालिका प्रशासनाचे कौतुक केले आहे. उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा, असे सांगत फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, पुण्यात सध्या अतिक्रमणांविरुद्ध, विशेषत: बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधात कारवाई सुरू आहे. मी पुणे महानगरपालिका प्रशासनाचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. नागरिकांना शहरातील पायाभूत सुविधांचा योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी आणि पादचा-यांसाठी पुरेशी जागा असायला हवी. शेवटी, नियम केवळ सरकारी ठरावांमध्ये किंवा अधिकृत कागदपत्रांत छापण्यासाठी नसतात; तर त्यांचे पालन होणेही आवश्यक असते. याचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांचे जीवन सुस करणे हा आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
















