31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeसोलापूरइकडे पाठिंबा तिकडे कारवाई टळली

इकडे पाठिंबा तिकडे कारवाई टळली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने मोठा ट्विस्ट तयार झालाय. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिजीत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पाठिंबा काढून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करण्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर आता अभिजीत पाटील यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. ४४२ कोटी थकवल्याप्रकरणी कारखान्याचे गोदाम सील करण्यात आले होते. मात्र आता कारवाईतून दिलासा मिळताच गोदामाचे सील काढले जाणार आहे. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने कारवाई केली. कारखान्याची तीन गोदामे बँकेने सील केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR