28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रवाघाचा हल्ला समोरून

वाघाचा हल्ला समोरून

सांगली : वाघ हा समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही. सांगलीतला वाघ कोण हे ४ जूनला निकालानंतर कळेल असा खोचक टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे वाघ असले तरी आम्ही सांगलीतील वाघ आहोत असे विधान कदम यांनी केले होते. त्यावर राऊतांनी हे भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले की, सांगलीत वसंतदादा पाटील हा वाघ आम्ही पाहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे आम्ही पाहिलेत, वाघाची रचना आणि वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील पण ते वाघ आहेत की नाही हे ४ जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटलांना विजयी केले तर ते नक्कीच वाघ आहेत अशी पदवी आम्ही त्यांना देऊ. मविआच्या इथल्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला वाघ असल्याचं सिद्ध करायचे असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांना विजयी केले पाहिजे मग आम्ही ४ जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR