नाशिक : भाजपमध्ये उमेदवारीसाठी यापूर्वी असे प्रकार कधीही घडले नाहीत. जे झाले ते वाईट झाले. तिकिटांसाठी कुणी दलाली करत असेल हा गंभीर प्रकार आहे. यापुढे पक्षात असे दलाल दिसणार नाहीत, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघटक शिवकुमार यांनी दिल्याचे समजते.
भाजपच्या तिकीट वाटपात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आ. सीमा हिरे आणि काही पदाधिका-यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांची भेट घेतली. त्यात तिकीट वाटपाच्या दिवशी झालेला गोंधळ आणि एबी फॉर्मचे वाहनातून होता असलेले वाटप, त्यानंतर फार्म हाऊसबस घडलेल्या नाट्याची माहिती देण्यात आली. यावर नाराजी व्यक्ता करता मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार यांनी खेद व्यक्त केला. सिडकोत आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांच्यातील वाद टाळण्यासाठी भाजपच्या मुळ यादीनुसार उमेदवारी पुरस्कृत केली आण्याची शक्यता आहे.
सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक २९ आणि २५ अशा दोन – प्रभागात अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी प्रभाग २० मधून त्यांना उमेदवारी करण्यात सांगण्यात येईल. प्रभाग २२ अधिकृत उमेदवार मुकेश शहाणे यांना आता भाजप पुरस्कृत अपक्ष करण्यात येईल तसेच प्रभाग क्रमांक २५ मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री डोमसे आता अपक्ष असल्या तरी त्यांना पुरस्कृत केले जाऊ शकते, अशा वेळी बडगुजर यांना स्वत: आणि पत्नी हर्षा बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर यापैकी दोघांनाच संधी देता येईल.
नाराजी दूर होईल
माघारी अंतिम मुदतीपर्यंत अंतर्गत मोडीत निघालेली असेल यासाठी पक्षाने आदेश जे पाळणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई होईन. मग त्या जागी बडगुजर असतील तरी त्यांना वगळले जाणार नाही, असेही केदार यांनी स्पष्ट केले.

