मुंबई : मुंडेंविरोधात कुणी पुरावे दिले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आता मुंडेविरोधात पुरावा मिळाला तर खरंच त्यांची चौकशी केली जाणार का? आणि त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी पोलिसांनी अत्यंत प्रोफेशनली तपास केल्याचे सांगितले. शिवाय या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण चार्जशिटमध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही तरी देखील त्यांचा राजीनामा घेतला. त्याचे मुख्य कारण म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये ज्याला मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मुंडे यांचा राईट हॅन्ड असून वर्षानुवर्ष त्याने धनंजय मुंडेंचे राजकारण सांभाळले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची अपेक्षा होती की, नेत्यांच्या जवळचे लोक इतक्या क्रूर पद्धतीचे काम करत असतील तर नेत्यांनी पश्चाताप म्हणून किंवा नैतिकतेच्या आधारावर तरी अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
शिवाय या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत ते म्हणजे चार्चशिटमध्ये धनंजय मुंडेंचे नाव नाही आणि वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे. तसेच कोणाच्या जवळचा व्यक्ती आहे म्हणून त्याची चौकशी करता येत नाही. त्या संपूर्ण घटनेत जर त्या व्यक्तिविरोधात काही पुरावा असेल तर त्याची चौकशी करता येते.
पुरावे नसताना हवेत तीर मारू नका
अशा प्रकारचा पुरावा काही आढळला का कोणी दिला का? रोज येऊन कोणीतरी टीव्हीवर बोलायचे आणि त्यावर पोलिसांनी तपास करायचा असे चालत नाही. मात्र, धनंजय मुंडे यांच्याविरोधात आताही कोणी आजही पुरावा आणून दिला त्यांची चौकशी करण्याची आणि त्यांच्यावर कारवाईची करण्याची आमची तयारी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसंच पुरावे नसताना उगीचच हवेत तीर मारण्यात काहीही अर्थ नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.