28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकृतीशील लोकशाही अधिक आकर्षक

कृतीशील लोकशाही अधिक आकर्षक

मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीचा रविवार दि. ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. त्यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे.

आनंद महिंद्रा यांनी निवडणूक निकालाचा फोटो शेअर करत, केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोणताही खेळ किंवा ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कृतीशील लोकशाही ही अधिक आकर्षक आणि रोमांचकारक आहे. विधानसभा निवडणूक निकालाबाबत सर्वसामान्य जनतेसह, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना देखील या निकालाची किती उत्सुकता आहे हे दिसत आहे. मध्य प्रदेशातील २३० जागांचे निकाल रविवारी जाहीर झाला आहे.

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जादू दिसून आली आहे. मध्य प्रदेशात भाजपने १५० च्यावर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, मध्य प्रदेशात भाजपला यश मिळत असल्याचे दिसत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर पोस्ट करत ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ असा नारा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR