25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमनोरंजनकारागृहात अभिनेता दर्शनला मिळते विशेष वागणूक?

कारागृहात अभिनेता दर्शनला मिळते विशेष वागणूक?

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

बंगळुरू : कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी कन्नड चित्रपट अभिनेता दर्शन थुगुडिपा आणि त्याची कथित मैत्रीण आणि सहकलाकार पवित्रा गौडा यांना तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचे आरोप फेटाळले आहेत.

एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन थुगुडिपा आणि पवित्रा गौडा तुरुंगात आहेत. सामान्य कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा दर्शन थुगुडिपा याला मिळत असल्याचे परमेश्वरा म्हणाले.

कर्नाटकचे गृहमंत्री पुढे म्हणाले की, मी पोलिसांना सार्वजनिक हितासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देईन, परंतु आम्ही त्यांना या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करू देऊ. पोलिस अभिनेत्याला बिर्याणी देतात आणि कोणत्याही आरोपीला विशेष सुविधा देत असल्याचा आरोप चुकीचा आहे. हे घडू शकत नाही आणि होऊ नये. या आरोपांबाबत मी प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांशी आणि आयुक्तांशी बोललो असून, अधिका-यांनी मला अशी कोणतीही सुविधा दिली जात नाही आणि दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR