27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनअभिनेता गोविंदाच्या पायात घुसली गोळी;रुग्णालयात उपचार सुरू

अभिनेता गोविंदाच्या पायात घुसली गोळी;रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती मिळत आहे. स्वत:च्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली, त्यामुळे गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायावर तात्काळ शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती मिळत असून गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR