मुंबई : राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करत किरण माने म्हणाले, शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेले असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे .
किरण माने पुढे म्हणाले, संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल. किरण मानेंनी शिवबंधन बांधल्यानंतर शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, माने तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे. आपण दोघेही लढू. सेनेत तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आलात त्याचा अभिमान वाटेल पुढेही.