27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनअभिनेते क्षितीज झारापकर यांचे कर्करोगाने निधन

अभिनेते क्षितीज झारापकर यांचे कर्करोगाने निधन

मुंबई: मराठी अभिनेते क्षितीज झारापकर यांचे आज (दि. ५) सकाळी कर्करोगामुळे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. आज सकाळी हृदयविकाराचा झटका येऊन वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अन्त्यदर्शनासाठी दादर शिवाजी पार्क येथील घरी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेते क्षितीज झारापकर यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, ठेंगा, यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. यापूर्वी अभिनेते क्षितीज झारापकर हे आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR