36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी

प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी

प्रकाश शेंडगे यांची टीका

सांगली : वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर ओबीसी, बहुजनांऐवजी धनदांडग्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे, अशी टीका ओबीसी बहुजन पार्टीचे नेते, माजी आमदार अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आंबेडकर यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी साथ दिल्याचेही जाहीर केले.

शेंडगे म्हणाले, ओबीसी, बहुजनांच्या न्यायासाठी आम्ही लोकसभा निवडणुकीत उभे राहिलो. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमच्या पार्टीतर्फेही त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता.

त्यांची निवडणूक संपल्यानंतर त्यांनी आमचा पाठिंबा काढून घेतला. अपक्ष उमेदवाराचे बंधू भेटल्यानंतर एका तासात हा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. बारामती, पुणे याठिकाणी त्यांनी धनदांडग्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्याविरोधातच आम्ही निवडणूक लढतो आहोत. मात्र, बंधूंनी आता आम्हाला पाठिंबा दिला आहे.’

ते म्हणाले, प्रचारावेळी ठिकठिकाणी आमच्यावर हल्ले, अडवणूक केली जात आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र, यातील संशयितांवर कारवाई झाली नाही. भविष्यात जर असे हल्ले झाले तर जशास तसे उत्तर देऊ.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR