Homeमनोरंजनअभिनेत्री सोनम कपूर दुस-यांदा झाली आई

अभिनेत्री सोनम कपूर दुस-यांदा झाली आई

वयाच्या ४० व्या वर्षी सोनमने गोंडस बाळाला दिला जन्म 

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी दुस-यांदा आई झाली आहे. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

सोनम कपूरने २९ मार्चला मुलाला जन्म दिला. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी २०१८ ला लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्या मुलाचे वायू कपूर अहुजाचे स्वागत केले. सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. तसेच ती आपल्या फिटनेसकडे देखील विशेष लक्ष देते. एक खास भावनिक पोस्ट करून सोनम कपूरने बाळाच्या स्वागताची बातमी चाहत्यांना दिली आहे.

कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या मनाने आम्ही आमच्या बाळाच्या (मुलाच्या) आगमनाची गुडन्यूज देत आहोत. मी २९ मार्च २०२६ रोजी बाळाला जन्म दिला. आमच्या कुटुंब आता मोठे झाले आहे. ‘वायु आपल्या धाकट्या भावाचे स्वागत करण्यास अत्यंत उत्सुक आणि आनंदी आहे. बाळाच्या येण्याने आमचे घर सुख-समृद्धीने आणि चैतन्याने भरून गेले आहे. आम्ही धन्य आहोत. चार जणांचे कुटुंब म्हणून या सुंदर नव्या पर्वाची सुरुवात करता आहोत…सोनम, आनंद आणि वायु यांच्याकडून तुम्हाला खूप प्रेम.. सोनम कपूरच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्यांनी नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR