22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeक्रीडाअ‍ॅडम झाम्पाची आयपीएल २०२४ सत्रामधून माघार

अ‍ॅडम झाम्पाची आयपीएल २०२४ सत्रामधून माघार

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ च्या सत्राला आजपासून सुरुवात होत आहे. अशातच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅडम झाम्पाने या सत्रातून आपले नाव मागे घेतले आहे. झाम्पाला या मोसमात राजस्थान रॉयल्सने कायम ठेवले होते. त्याला राजस्थान रॉयल्सने २०२३ मध्ये विकत घेतले होते. झाम्पाच्या जागी राजस्थानने अद्याप नवीन खेळाडूची घोषणा केलेली नाही. आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. हा सामना २४ मार्च रोजी जयपूर येथे खेळला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅडम झाम्पाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२४ मधून आपले नाव मागे घेतले आहे. झाम्पा ब-याच दिवसांपासून सतत क्रिकेट खेळत होता. तो भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका, न्यूझिलंडविरुद्ध मालिका आणि विश्वचषक २०२३ चा भाग होता. यामुळे त्याने ब्रेक घेतला आहे. मात्र, झाम्पाच्या या निर्णयामुळे राजस्थानचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याच्या जागी संघाने अद्यापही कोणत्याही नवीन खेळाडूची घोषणा केलेली नाही. आयपीएल २०२३ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने झाम्पाला त्याच्या मूळ किंमत १.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. यानंतर संघाने त्याला आयपीएल २०२४ साठी कायम ठेवल होते. अ‍ॅडम झाम्पाच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत २० सामने खेळले असून, त्यामध्ये झाम्पाने २९ विकेट घेतल्या आहेत. तर गेल्या सत्रात ६ सामने खेळले. या कालावधीत त्याने ८ बळी घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR