35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यागॅस सिलिंडर ३०० रुपयांना मिळणे शक्य!

गॅस सिलिंडर ३०० रुपयांना मिळणे शक्य!

नाशिक : स्वयंपाकासाठी वापरात येणा-या घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिक, ऑटो रिक्षा व एलपीजी गॅस वाहनांसाठी उघडपणे वापर होत असल्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत ८५० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापरासाठी झाल्यास ३०० रुपयांपर्यंत दर कमी होतील. त्यासाठी शासनाने सिलिंडर वितरित करणा-या कंपन्यांना बायोमेट्रिक व बारकोड प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्याची मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने केली आहे.

केवळ ५ टक्के लोक विजेवर चालणा-या इंडक्शन चुलीचा वापर करतात. चुलीचा वापर थांबवण्यासाठी गॅस हा सक्षम पर्याय असून, त्याची किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात येणे सहज शक्य आहे. गॅस सिलिंडर वितरित करणा-या कंपन्या सर्रासपणे घरगुती गॅस व्यावसायिक वापरासाठी देतात.

नाशिक शहरातून साधारणत: ८०० हॉटेल्स, रिक्षा व एलपीजी गॅसवर चालणा-या वाहनांना दिला जातो. त्यातून शासनाचा पाच ते सहा कोटी रुपये जीएसटी बुडत आहे. एकट्या नाशिक शहराचा हा आकडा असून देशभरात कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सोळंके यांनी सांगितले.

गॅस वितरित करणा-या कंपन्या व्यावसायिकांना अगदी सहजपणे घरगुती गॅस सिलिंडर विकतात. एखाद्या व्यक्तीला वर्षाला १२ सिलेंडरचा कोटा नि­श्चित केलेला असेल आणि त्यांनी फक्त पाच ते सात सिलिंडर वापरले तर उर्वरित कोटा वितरक विकतात. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सेटिंग केलेली असल्यामुळे त्याचा साधा मेसेजही येत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या लक्षात ही बाब येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात घरगुती गॅस
सिलिंडरची वाढती विक्री
१९८० : ०.३१ कोटी
२००१ : ५.७८ कोटी
२०२२ : ३०.५३ कोटी
२०२३ : ३१.४ कोटी
२०२३ : ९.५८ कोटी (उज्वला गॅस)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR