28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआदित्य एल१ मिशनने सुरू केले सौर वाऱ्याचे निरीक्षण

आदित्य एल१ मिशनने सुरू केले सौर वाऱ्याचे निरीक्षण

नवी दिल्ली : सूर्याचा अभ्यास करणारी भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम आदित्य एल१ बाबत शनिवारी एक मोठे अपडेट समोर आले आहे. आता आदित्य एल१ ने सौर वाऱ्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने सांगितले की, उपग्रहावरील आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (एएसपीईएक्स) पेलोडने त्याचे कार्य सुरू केले असून ते सामान्यपणे कार्यरत आहे.

अस्पेक्समध्ये सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (एसडब्लूआयएस) आणि सुपरथर्मल आणि पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (स्टेप्स) ही दोन उपकरणे असतात. इस्रोने सांगितले की, स्टेप्स १० सप्टेंबर रोजी कार्यान्वित झाले तर एसडब्लूआयएस इन्स्ट्रुमेंट शनिवारी सक्रिय झाले आणि त्यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. स्पेस एजन्सीने एक्सवर एक फोटो देखील शेअर केला आहे जो नवीन पेलोडद्वारे कॅप्चर केलेल्या प्रोटॉन आणि अल्फा कणांच्या संख्येतील ऊर्जा भिन्नता दर्शवितो.

२ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून इस्रोचे पहिले सौर मिशन आदित्य एल १ प्रक्षेपित करण्यात आले होते. आदित्य-एल१ पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर असलेल्या सूर्य-पृथ्वी लॅग्रॅंजियन पॉइंटवर (एल-१) पोहोचून सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करत आहे. तसेच भारताच्या इतर सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा समावेश आहे. ज्याचे उद्दिष्ट प्रथमच अंतराळवीरांना कक्षेत, शक्यतो २०२५ पर्यंत प्रक्षेपित करण्याचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR