25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीय‘आदित्य’ ६ जानेवारीला गंतव्यस्थानावर पोहोचेल

‘आदित्य’ ६ जानेवारीला गंतव्यस्थानावर पोहोचेल

लॅग्रेंज पॉईंटवर कधी पोहोचेल हे योग्य वेळी सांगू इस्रोने दिली माहिती

अहमदाबाद : भारताचे एकमेव सौर मिशन आदित्य एल १ हे ६ जानेवारीला त्याच्या गंतव्य स्थानावर म्हणजेच लँग्रेज पॉइंट येथे पोहोचेल. हे ठिकाण पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर आहे. इस्रोचे प्रमुख के सोमनाथ यांनी २३ डिसेंबर रोजी ही माहिती दिली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून २ सप्टेंबर रोजी आदित्य एल १ चे प्रक्षेपण करण्यात आले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.

आदित्य एल १ त्याच्या गंतव्यस्थानी कधी पोहोचेल याची घोषणा योग्य वेळी केली जाईल, असेही सोमनाथ म्हणाले. सोमनाथ अहमदाबाद येथील भारतीय विज्ञान परिषदेत पोहोचले होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी या गोष्टी शेअर केल्या. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आदित्य एल १ लँग्रेज पॉईंटवर पोहोचेल तेव्हा आम्ही पुन्हा एकदा इंजिन सुरू करू, जेणेकरून ते पुढे जाऊ नये. जेव्हा ते त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचते तेव्हा ते त्या बिंदूभोवती फिरते आणि तिथेच राहते. इस्त्रो प्रमुख म्हणाले की, एकदा आदित्य एल १ त्याच्या नियुक्त केलेल्या लॅग्रेंज पॉईंटवर यशस्वीरित्या स्थापित झाल्यानंतर ते तेथे ५ वर्षे राहील. आदित्य एल १ केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला सूर्यप्रकाशात होणा-या उपक्रमांची माहिती देईल. हा डेटा सूर्याची गतिशीलता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. सूर्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यास देखील हा डेटा मदत करेल.

एल १ म्हणजे काय?
इटालियन-फ्रेंच गणितज्ज्ञ जोसेफ-लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून लॅग्रेंज पॉइंटचे नाव देण्यात आले आहे. त्याला बोलचालीत एल १ असे म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच बिंदू आहेत, जिथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल संतुलित होते आणि केंद्रापसारक शक्ती तयार होते. अशा स्थितीत एखादी वस्तू या बिंदूूवर ठेवली तर ती सहज त्या बिंदूूभोवती फिरू लागते. पहिला लॅग्रेंज पॉइंट पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. या बिंदूूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही.

सूर्याचा अभ्यास का महत्त्वाचा आहे?
सूर्य हा सूर्यमालेचा केंद्र आहे ज्यामध्ये आपली पृथ्वी अस्तित्वात आहे. आठही ग्रह सूर्याभोवती फिरतात. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. सूर्यापासून ऊर्जा सतत वाहत असते. याला आपण चार्ज केलेले कण म्हणतो. सूर्याचा अभ्यास करून सूर्यामध्ये होणारे बदल पृथ्वीवरील अवकाश आणि जीवनावर कसा परिणाम करतात हे समजू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR