24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्र‘एचएमपीव्ही’ व्हायरसमुळे प्रशासन अलर्ट मोडवर

‘एचएमपीव्ही’ व्हायरसमुळे प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई : चीनमध्ये ‘एचएमपीव्ही’ या नव्या व्हायरसने शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना महामारीचा एकदा चटका बसल्याने आता प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यात शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये बेडच्या संख्या राखीव ठेवण्यात येत आहेत. तर खबरदारी म्हणून औषधांचा साठा तयार ठेवण्यात येत आहे. एचएमपीव्ही रोगाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली आरोग्य विभाग अलर्टमोडवर आला असून अधिकारी आणि कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २५ बेड आयसीयू तर ५० जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत. तशी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून या रोगाच्या बातमीवर तपासण्या करण्याच्या सूचनाही सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत. राज्यात खबरदारी म्हणून सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विशेष पूर्वतयारी करण्यात आली आहे. रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात आले असून स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.

राज्य शासनाने वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली असून सर्व शासकीय रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांत यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. रुग्णालयांमध्ये किमान तीन महिने पुरेल इतका औषधांचा साठा ठेवण्यात आला आहे. हा आजार घातक नसल्याचे स्पष्ट करत, सर्दी, पडसे किंवा खोकला दीर्घकाळ असल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयात बेडची संख्या वाढवली
हिंगोली जिल्ह्यात एचएमपीव्ही या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात २५ आयसीयू बेड आणि ५० जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस यांनी रुग्णालयातील तयार केलेल्या वॉर्डचा आढावा घेतला असून, या रोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांतील अधिकारी व कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात या रोगावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR