25.5 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeपरभणीपाथरी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : लाहोटी

पाथरी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : लाहोटी

पाथरी/प्रतिनिधी
पाथरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सर्व पथकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्व पथकातील सदस्यांनी निवडणुकीचे काम करताना वेळेवर व अचूक होण्यासाठी निवडणूक कामे समन्वयाने करावेत असे निर्देश देत निवडणूक कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध कक्षांची स्थापना केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सांगितले.

पाथरी विधानसभा निवडणूक संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी लाहोटी बोलत होते. पुढे बोलताना लाहोटी म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष तथा नामनिर्देशन कक्ष, संगणक कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, वाहतूक आराखडा कक्ष, लेखा विभाग, ई.व्ही.एम./व्ही.व्ही.पॅट कक्ष, मतदान साहित्य कक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष, मतपत्रिका कक्ष, मतदार यादी कक्ष, प्रशिक्षण कक्ष, एक खिडकी सुविधा कक्ष, स्ट्राँग रूम, मीडिया सेंटर कक्ष, स्विप कक्ष, निवडणूक निरीक्षक कक्ष, आरोग्य कक्ष, तक्रार व निवारण कक्ष अशा एकूण २६ पथकांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे लाहोटी यांनी यावेळी सांगितले.

या सर्व पथकांच्या कामावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचे लक्ष राहणार आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड, सुनील कावरखे व शंकर हंदेशवार काम पाहणार आहेत. निवडणूक विभागातील जी. एल.अन्नपुरे, जे. व्ही. धारासुरकर, भालचंद्र जामकर आदी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR