परभणी : इंग्लंड येथील शेफिल्ड शहरामध्ये १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या ११ वर्षाखालील जागतिक ऑलंपिक आशेचा किरण या स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये परभणीची आद्या बाहेती हिने कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेमध्ये पाच खंडामधील धात्री तातिकोंडा (ऑस्ट्रेलीया ), टिफनी झान (कॅनडा), झिना फारूक (इजिप्त), इसाबेला शिओ ज्यू (इंग्लंड), कामिला कादार (फिनलंड), क्लिओ मादेसी (ग्रीस), यास्मीन अराकी (ग्वातेमाला), व्हॅलेरिया ऑर्टिझ (ग्वातेमाला), आद्या महेश बाहेती (भारत), वान सुआन योंग (मलेशिया), यु हान अंबेले चुआ (मलेशिया), केटी चेन (न्यूझीलंड), पायला बेनिटेज (पराग्वे), गिया मेयवा केकॉमट गाम्बोआ (पेरू), बियांका स्टेफानिया टोमा (रोमेनिया), रितेज चरीफ (ट्युनिशिया), एझोझा खुराझोवा (उझबेकिस्तान), लोरिएड्नी पिनेडा (व्हेनेझुएला) या १६ खेळाडूंनी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये परभणीच्या बाहेतीने एकूण १५ सामन्यांमधील १३ सामन्यांमध्ये विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.
आद्या ही भारतीय खेल प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत चालणा-या परभणी येथील खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र व मिशन लक्षवेध प्रतिभा विकास केंद्रामध्ये चेतन मुक्तावर व सूरज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते. या यशासाठी अद्याला अनिल बंदेल, सचिन पुरी, असद अली, अजय कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
अद्याने मिळवलेल्या यशासाठी टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे, सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा सचिव गणेश माळवे, परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, जिल्हा संघटना सहसचिव ज्ञानेश्वर पंडित यांच्यासह प्रशिक्षक विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते,भक्ती मुक्तावार, विश्वनाथ स्वामी यांचे सरावास सहकार्य लाभते. या यशाबद्दल सर्व पालकांनी आद्या बाहेतीचे अभिनंदन केले आहे.
















