अफगाणने चीनपर्यंत बांधला रस्ता

काबूल/नवी दिल्ली : अफगाणिस्तानने ईशान्येकडील बदख्शान प्रांतातील वाखान कॉरिडॉरमार्गे चीनच्या शिनजियांगपर्यंत १२१ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला आहे. सुमारे ५५ लाख डॉलर खर्चून बांधलेल्या या रस्त्याचे उद्घाटनही झाले आहे. हा रस्ता अफगाणिस्तान आणि चीनमधील पहिला थेट भूप्रदेशीय मार्ग आहे.

तालिबान सरकारला या रस्त्यामार्फत आपली नैसर्गिक संसाधने आणि सोन्याच्या खाणी चीनच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे इतर देश आणि परदेशी कंपन्यांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यास त्यांना मदत होऊ शकते. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग धोरणात्मकदृष्टयाही महत्त्वाचा मानला जात आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी यांची भेट घेताना वाखानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर भारताचे लक्ष असल्याचे सांगितले होते.

चीनसाठी खनिज-कनेक्टिव्हिटीचा मार्ग
चीनसाठी वाखान कॉरिडॉर शिनजियांगच्या सुरक्षेच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चीनने याच वर्षी या भागात एक नवीन प्रशासकीय कॉरिडॉरही तयार केला आहे. या मार्गामुळे चीनला अफगाणिस्तानातील सोने आणि इतर खनिजांपर्यंत सहज पोहोच मिळू शकते. तसेच इराण आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांपर्यंतही जमिनीमार्गे पोहोच मिळू शकते.

भारतासाठी चिंतेचा विषय का?
वाखान कॉरिडॉर भारताच्या दाव्यातील गिलगिट-बाल्टिस्तानजवळ आहे. अशा परिस्थितीत या भागातील चीनची वाढती उपस्थिती भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. हा प्रदेश लडाखच्या जवळही आहे. त्यामुळे भारताला उत्तरेकडील सीमेवर देखरेख आणि सुरक्षा वाढवावी लागू शकते.

भारताला धोरणात्मक उपस्थिती वाढवावी लागेल
संरक्षण तज्ज्ञ एनसी बिपिंद्रा यांच्या मते, वाखानमध्ये चीन आणि मध्य आशियाचे हितसंबंध जोडलेले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव तसेच या भागातील चीनची वाढती उपस्थिती यामुळे वाखानचे महत्त्व वाढले आहे. त्यांच्या मते, भारताने अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांशी संपर्क वाढवून आपली राजनैतिक आणि राजकीय उपस्थिती मजबूत केली पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news