लाहोर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने इब्राहीम झाद्रान याच्या १७७ धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर ३२६ धावांचे आव्हान ठेवले होते.
इंग्लंडने या धावांचा शानदार पाठलाग करत ४९ ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून ३१३ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १३ धावांची तर अफगाणिस्तानला १ विकेटची गरज होती. गरज होती. मात्र अझमतुल्लाह ओमरझई याने शेवटच्या ओव्हरमधील ४ चेंडूत ४ धावा दिल्या. तर पाचव्या चेंडूवर आदिल रशीद याला इब्राहीम झाद्रान याच्या हाती कॅच आऊट केले. इंग्लंडचा डाव यासह ४९.५ ओव्हरमध्ये ३१७ धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने अशाप्रकारे विजय मिळवला. तर या पराभवासह इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून अधिकृतरित्या बाहेर झाली.