30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयलोकसभेनंतर इंडिया आघाडीचा पोटनिवडणुकीमध्येही मोठा विजय

लोकसभेनंतर इंडिया आघाडीचा पोटनिवडणुकीमध्येही मोठा विजय

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सात राज्यांमधील १३ जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली यांपैकी १० जागांवर इंडिया आघाडीने विजय मिळवला आहे. तर केवळ एकच जागा भाजपने जिंकली आहे. तर इतर दोन जागा अपक्षांनी राखल्या. यामुळे इंडिया आघाडीला पुन्हा लोकांनी बळ दिल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये ४, हिमाचल प्रदेशात ३, उत्तराखंडमध्ये २, बिहार १, मध्य प्रदेश १, पंजाब १ आणि तामिळनाडूत १ या राज्यांमध्ये १० जुलै रोजी पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. तर आज या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये १३ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात होते. यांपैकी १० जागा इंडिया आघाडीने जिंकल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील सर्व चार जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. हिमाचलमधील तीन पैकी दोन जागा काँग्रेसने तर एक जागा भाजपने जिंकली आहे. तसेच उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बिहारमधील १ जागा अपक्ष, पंजाबमधील १ जागा आप, मध्य प्रदेशातील १ जागा भाजप आणि तामिळनाडूतील १ जागा डीएमके या पक्षांनी जिंकल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR