22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमाझी लायकी, आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!

माझी लायकी, आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार

मुंबई : कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार आता का घाबरले आहेत, माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतला. बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केलं. विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे.

मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय, मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत, असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला. विजय शिवतारे यांनी दुस-यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच अजित पवारकिंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभं राहण्याचा पवित्रा शिवतारेंनी घेतला आहे.

अजित पवारांवर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले की, अजित पवार म्हणाले होते विजय शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच. अजित पवारांना माझा आवाका किती हे सांगतो. मी एवढा लहान आहे, माझी लायकी काय हे पण सांगतो. अशी टीका करणारे अजित पवार आता एवढे का तडपडतात.

दरम्यान, विजय शिवतारेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. या भेटीनंतर शिवतारे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे.

युतीधर्म पाळावा लागेल : मुख्यमंत्र्यांची सूचना
बारामतीमध्ये युतीधर्म पाळा असे संकेत मुख्यमंत्र्यांना आपल्याला दिले असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षांमध्ये अजित पवारांना विरोध करणारा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच लोकांना माझ्या उमेदवारीची उत्सुकता आहे. अजित पवार निवडून येणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचे काहीही होवो, आपण त्यामध्ये पडू नये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR