22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरपाणी सोडण्यासाठी पाण्यात पाय घालून आंदोलन

पाणी सोडण्यासाठी पाण्यात पाय घालून आंदोलन

मोहोळ – सीना नदीवर घाटणे बंधारा येथील मोहोळ शहरवासियांसाठी पिण्यासाठी अडवून ठेवलेले पाणी कोळेगाव बंधारा येथे तत्काळ सोडावे, या मागणीसाठी तसेच जोपर्यंत पाणी कोळेगाव बंधाऱ्यात येत नाही, तोपर्यंत मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर पाण्यात पाय घालून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

मोहोळ शहरांमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. पर्यायाने शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या कोळेगाव बंधारा येथे पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ घाटणे बंधारा येथील पाणी कोळेगाव बंधारा येथे सोडून मोहोळ शहराची पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली असून जोपर्यंत पाणी कोळेगाव बंधारा येथे येत नाही, तोपर्यंत पाण्यात पाय घालून आंदोलन मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, राजेश सुतार, रुपेश धोत्रे, नागेश बिराजदार, सुरेश गाढवे, अझरुद्दीन शेख, दत्ता खवळे, अतुल गावडे, नागेश पुराणिक, यशोदा कांबळे, कल्पना खंदारे, गौतम क्षीरसागर, हेमंत गरड, अभय गायकवाड, बंडू देशमुख, संतोष खंदारे, शकील शेख, दादा ओहोळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR