पंचकुला : हरियाणाच्या पंचकुला येथे मोरनीजवळ बालदवाला गावांत अचानक एक फायटर जेट कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनाग्रस्त जग्वार जेट विमानाचा पायलट पॅराशुटच्या मदतीने खाली उतरण्यात यशस्वी ठरल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश भारतीय वायू दलाने दिले आहेत. घटना स्थळी विशेष तज्ज्ञांची टीम देखील रवाना झाली आहे.
पायलटमुळे गावकऱ्यांचे प्राण वाचले.
हा अपघात इतका भयानक होता की याचा अंदाज यावरुन येतो की अपघातानंतर या विमानाचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेले आहेत. जग्वार फायटर जेट नियमित प्रशिक्षणाचे उड्डाण करीत होते., त्यानंतर अंबाला दरम्यान या जग्वार फायटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे भारतीय वायूसेनेने म्हटले आहे. पायलटने विमानाला सुरक्षित रूपाने गावाच्या दाट वस्तीच्या हद्दीबाहेर नेण्यात यश आल्याने अनेक गावकऱ्यांचे प्राण वाचल्याचे म्हटले जात आहे.
वायुसेनेने दिले चौकशीचे आदेश
वायुसेनेने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर म्हटलेय की, भारतीय वायुसेनेचे एक जग्वार फायटर जेट विमान सिस्टीममध्ये दोष निर्माण झाल्याने क्रॅश झाल्याचे म्हटले आहे. या अपघाताच्या घटनेचे सत्य बाहेर येण्यासाठी वायुसेने चौकशीचे आदेश दिले आहेत.