17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-बंगळुरू रोडवर विमान उतरण्याची सुविधा

मुंबई-बंगळुरू रोडवर विमान उतरण्याची सुविधा

सांगली : प्रतिनिधी
नवी मुंबई-बंगळुरू महामार्ग बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, या रोडवर ५ ठिकाणी विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गाने ८०० किलोमीटर अंतर आठ तासांत पार करता येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील दहिवडी, मायणी, विटा या रस्त्याचे काँक्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जोन्नतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विटा येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई, पुणे, बंगळुरू द्रुतगती मार्गाची लांबी ८०० किलोमीटर असणार आहे.

सहापदरी असणा-या या महामार्गावर पाच ठिकाणी मार्गावरच मालवाहू विमान उतरण्याची सोय म्हणजेच धावपट्टी बांधण्यात येणार आहे. याद्वारे वाहतूक जलद होऊन त्यावरील खर्चातही बचत होईल. या नव्या मार्गाने नवी मुंबई ते बंगळूरू हे अंतर केवळ आठ तासांत पार करता येईल, असे गडकरी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR