23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeअंतरराष्ट्रीयविमान-हेलिकॉप्टर घातपात; १९ प्रवाशांचा दुर्घटनेत मृत्यू

विमान-हेलिकॉप्टर घातपात; १९ प्रवाशांचा दुर्घटनेत मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. नदीतून १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या विमानात ६४ प्रवासी होते. हेलिकॉप्टरला विमान धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे, मात्र हा घातपाताचा प्रकार असावा असे म्हटले जात आहे. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं. अमेरिकेतील कंसास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका प्रवासी विमानाची आणि लष्करी हेलिकॉप्टरची धडक झाली. हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळले. यात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकन लष्कराचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन ईगलच्या विमानाची धडक झाली. ६५ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात वैमानिक, कर्मचा-यांसह ६४ लोक होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा आता अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा एफबीआयने तपास सुरू केला आहे. जी माहिती आता समोर आली आहे, त्यानुसार अमेरिकी लष्कराच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरने अमेरिकन ईगलच्या विमानाला धडक दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR