मुंबई : वृत्तसंस्था
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अलीकडेच जोरदार रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या एका व्हायरल व्हीडीओमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळणार असे दिसत आहे. कारण या व्हीडीओमध्ये अभिषेक पत्नी ऐश्वर्यासोबत मस्त डान्स करताना दिसत आहे.
दरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. अनेकदा ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत एकटीच दिसली. पण आता या सर्व चर्चांवर पडदा पडणार असे दिसून येत आहे. कारण या पती-पत्नीचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामुळे आता चाहत्यांचा संभ्रम दूर होणार असे दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता काही नवीन नाहीत. ब-याच महिन्यांपासून त्यांच्या कौटुंबिक वादाबद्दल आणि त्याच्या घटस्फोटाबद्दल ब-याच आणि वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. पण काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे असे काही फोटो आणि व्हीडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असे दिसत आहे.
या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान लेक आराध्याच्या शाळेतील एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हीडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा डान्स पाहायला मिळत आहे. शाळेतील मुलांसोबत ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे डान्स करत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. आराध्याची अॅक्टिंग पाहायला ऐश्वर्या, अभिषेक तसेच अमिताभ बच्चनसुद्धा पोहोचले होते.