27.3 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रथोडक्यात बचावले अजित पवार, फडणवीस !

थोडक्यात बचावले अजित पवार, फडणवीस !

पायलटच्या कौशल्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटना टळली

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात सुदैवाने बचावले आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पावसाळी ढगात भरकटले होते. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.

चार महत्त्वाचे नेते या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यावेळी हेलिकॉप्टर भरकटले होते. गडचिरोलीत खराब हवामानाचा फटका त्यांना बसला होता. पण, सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपले कौशल्य दाखवल्याचे सांगितले जाते. त्याने सुखरूप हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले, असे वृत्तात सांगण्यात आले आहे.

अजित पवारांनीच हा किस्सा आज सांगितला आहे. हेलिकॉप्टर व्यवस्थित उडाले पण ते नंतर भरकटले. हेलिकॉप्टर ढगात गेले होते. पण, देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत होते, असे अजित पवार म्हणाले. सुदैवाने पायलटने कौशल्य दाखवत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले. त्यानंतर दोन्ही उपमुख्ममंत्र्यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

अजित पवार म्हणाले की, सुरुवातीला बरे वाटले, पण इकडे ढग, तिकडे ढग दिसत होते. मी फडणवीसांना म्हटले जरा बाहेर बघा. पण, ते म्हणाले काही काळजी करू नका. आतापर्यंत माझे सहा असे अपघात झाले आहेत. अशा अपघातामध्ये मला काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला देखील काही होणार नाही. तुम्ही निवांत राहा.

मी काळजीत पडतो होतो. पण, फडणवीस निवांत होते. मागची पुण्याई असेल. त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत. उदय सामंत देखील आमच्यासोबत होते. ते म्हणाले, दादा जमीन दिसायला लागली, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार कार्यक्रमात बोलताना हा किस्सा सांगत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR