29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक

शिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक

आमच्यावर वारंवार अन्याय शिंदेंच्या आमदारांनी मांडली व्यथा

रायगड : रायगडमध्ये महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने हे दिसून आले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवार दि. ११ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना बोलण्यात आले नाही. त्यामुळे तिन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बैठकीला न बोलवून आमचा अवमान केल्याचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र, मंत्री भरत गोगावले हेही नव्हते. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले आम्हाला निमंत्रण नव्हतं. खरं म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आदिती तटकरे या त्या बैठकीला उपस्थित होत्या. पण, आमच्या तिन्ही आमदारांनाही दुरान्वयानेही कल्पना नाही. निरोप पण आलेला नाही. यासंदर्भात मी डीपीओकडून माहिती घेतली. ते त्या बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी व्हर्च्युअली उपस्थिती होते.

भरत गोगावलेंना पालकमंत्री करावे
जिल्ह्यातील आमच्या कोणत्याही आमदाराला कोणतीही सूचना नव्हती. खरंतर ही बैठक अधिकृत की अनधिकृत आम्हाला माहिती नाही. पण, यासंदर्भात आमचे नेते एकनाथ शिंदेंसोबत आम्ही निश्चितपणे चर्चा करणार. आमच्यावर वारंवार होणा-या अन्यायाबद्दल न्याय मिळाला पाहिजे. रायगडमध्ये पालकमंर्त्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आमची आग्रही मागणी आहे की, भरत गोगावले पालकमंत्री व्हायला हवेत अशी मागणी आमदार दळवी यांनी पुन्हा एकदा केली.

बैठकीबद्दल माहिती नाही
आम्हाला बैठकीबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही एकनाथ शिंदेंसोबत चर्चा चर्चा करू, असे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR