21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीपरभणीत रविवारी अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन

परभणीत रविवारी अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन

परभणी : अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने परभणीत अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर येथे रविवार, दि. २१ रोजी सकाळी १० वाजता बालवाचकांचे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बालवाचक कवयित्री जिल्हा परिषद प्रशाला भोगाव ता. जिंतूर कु. अनुराधा चव्हाण तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद प्रशाला हादगाव (ता.पाथरी) बालवाचक कवयित्री कु. प्रियंका यादव या असणार आहेत. बालके वाचत आहेत, लिहीत आहेत. त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी अधिक संधी मिळावी.

साहित्यिकांशी संवाद साधता यावा. साहित्यातील विविध प्रकारांचा परिचय व्हावा म्हणून हे संमेलन आयोजित केले आहे. प्रथम सत्रामध्ये साहित्यिकाशी संवाद, बालवाचकांचे कवी संमेलन व कथाकथन तर दुस-या सत्रांमध्ये नाटक, गटचर्चा व भाषिक खेळ आणि उत्कृष्ट बालवाचकाचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. साहित्यिकांशी संवाद या सत्रात कवी का.रा.चव्हाण, नाट्य लेखक, दिग्दर्शक र्त्यंबक वडसकर तसेच गझलकार कवी अरविंद सगर यांच्याशी संवाद होणार आहे.

बालवाचकांना नाटक, अभिनय नेपथ्य, संहितालेखन याचा अनुभव यावा यासाठी जड झाले ओझे हे नृसिंह विद्यामंदिर पोखर्णी येथील बालकलाकारांचे बालनाट्य प्रदर्शित होणार आहे. शेवटी उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी दिली. संमेलन यशस्वी होण्यासाठी जिल्हा समन्वयक प्रकाश डुबे, कैलास सुरवसे, पंडित दाभाडे, इंदुमती कदम, दिपाली महिंद्रकर, रत्नमाला शेळके, सुशीला नवले, राजेंद्र शिंदे, नरहरी मुटकुळे, अनंता कदम, युवराज माने, बलभीम माथेले, मनीषा जोशी, महेश पुरी, राजेश चव्हाण, दिपक हारकळ, सुलोचना चांडोळकर, संतोष रत्नपारखी, मंजुषा देशमुख, वैशाली धाबे हे पुढाकार घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR